सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयातील आजी माजी सैनिकांसाठी सी.एस्.डी. कॅन्टीन सेवा (विस्तार कक्ष) १०९ इन्फट्री बटालियन (टी.ए.) मराठा लाईट इन्फट्री कोल्हापूर यांच्याकडुन मंजुर झालेली आहे. या सेवेचा शुभारंभ शुक्रवार दि.२३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या; सिंधुदुर्ग शाखा कोलगाव येथील बहुउद्देशीय हॉल मध्ये संपन्न झाला.सदर कँटीन मध्ये सर्व आजी माजी सैनिक, कुटुंबीय, अवलंबमिता, वीर पत्नी, वीर माता पिता यांचा त्यांना प्राप्त झालेल्या कँटीन कार्ड नुसार ग्रोसरी, इलेक्ट्रिक साहित्य, ब्युटी साहित्य, तसेच, लीकर, याचा लाभ घेता येईल. सदर कॅन्टीन मधील सर्व व्यवहार हे कॅशलेस पद्धतीने होणार आहेत. ज्यांची कार्ड रिन्यूव्ह झाली नाहीत अथवा ज्यांनी अद्याप पर्यंत कार्ड काढलं नाही आणि ज्यांची कार्ड मुदत बाह्य झालेली आहेत त्यांनी या कॅन्टीन मधील कॅन्टीन जेसीओ, नायब सुभेदार तानाजी जगताप यांच्याशी संपर्क साधावा. इतर आवश्यक माहिती कॅन्टीन नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.तरी या सेवेचा आजी, माजी सैनिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन चंद्रशेखर जोशी अध्यक्ष, इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग सिंधुदुर्ग जिल्हा सेंटर यांनी केले.
या कॅन्टीनची प्रमुख धुरा, ले. कर्नल प्रवीण शर्मा, कॅन्टीन ऑफिसर,तर एक्सटेंशन काउंटर प्रमुख नायब सुभेदार तानाजी जगताप व लान्स नायक विठ्ठल मुळे यांच्यावर सोपवण्यात आली.
का कार्यक्रमाचे गणेशपूजन सुभाष सावंत, संचालक सैनिक नागरी पतसंस्था, फलक उदघाटन पी. टी. परब, अध्यक्ष सैनिक फेडरेशन व सेवा नि. सैनिक संघ प्रतिनिधी, उमेश कारिवडेकर, धनंजय राऊळ प्रतिनिधी सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग व इतर संघटना प्रतिनिधी यांनी केले. साहित्य गोडावून चे उदघाटन बाबुराव कविटकर, अध्यक्ष सैनिक नागरी पतसंस्था, उमेश आईर, माजी सहा. सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग, शिवराम जोशी, माजी अध्यक्ष सैनिक नागरी पतसंस्था यांच्या हस्ते करण्यात आलं. सी. एस. डी. काउंटर उदघाटन नायब सुभेदार तानाजी जगताप, चंद्रशेखर जोशी, अध्यक्ष इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग सिंधुदुर्ग जिल्हा सेंटर यांच्या हस्ते आणि सर्व माजी सैनिक संघटना प्रमुख, व जेष्ठ सैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व मान्यवर, जेष्ठ माजी सैनिक, विविध संघटना प्रमुख, सैनिक पतसंस्था संचालक व कर्मचारी, सैनिक पत्नी, वीर माता, वीर पत्नी, व कुटुंबीय उपस्थित होते.
या उदघाटनाचे सूत्रसंचालन सुनील राऊळ, सिईओ यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाला सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले..
Screenshot 