नाणीज : जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून केवळ १५ दिवसात १ लाख ७१ हजार १५० रक्त बाटल्यांचे संकलन झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्त दानासारखे महान, पुण्यदायी, समाजहिताचे कार्य मोठ्या विक्रमी स्वरूपात साकार झाले आहे. या राष्ट्रहिताच्या व लोक कल्याणकारी कार्यामागची प्रेरणा आणि मार्गदर्शन होते जगदगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचे.
पंधरा दिवसात रक्तदानाच्या कार्याला एका लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदानासाठी लोकजागृती होणे ही सोपी गोष्ट नाही. या रक्तदानाचे वैशिष्ट्य म्हणजे युवावर्ग या कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. निमिया, सिकलसेल थॅलेसेमिया, हिमोफेलिया, किडनी फेल्यूअर, कॅन्सर अश्या प्रकारच्या गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या व अपघात ग्रस्त अशा हजारो रुग्णांना या रक्तदानाने मोफत रक्त उपलब्ध होणार आहे. हजारो रुग्णांचे प्राण या रक्तदान चळवळीने वाचणार आहेत. जानेवारीत रक्ताचा तुटवडा अधिक निर्माण होतो यासाठी समयसूचकतेने व दूरदृष्टीने रामानंदा चार्य नरेंद्रचार्यजी यांनी या रक्तदान महा कुंभाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!