इन्सुलि पंचायत समिती सदस्य पदा साठी महायुतीचे अधिकृत उमेदवार रामचंद्र चराटकर रिंगणात आहेत. गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात असल्याने प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर या गावाचा विकास निश्चित करेन. तसेच युवांच्या भवितव्यासाठी आपल्याला विजयी करा असे आवाहन आज निगुडे येथे श्री देवी माऊली, रवळनाथ येथे श्री फळ अर्पण त्यांनी मतदारांना केले. यावेळी इन्सुलि जिल्हा परिषद मतदार संघाचे युतीचे अधिकृत उमेदवार शावियर फर्नांडिस, नारायण राणे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, समीर गावडे, पंचायत समिती सदस्य पदाचे आदि युतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
