filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 32;

सर्वच निवडणुका शिवसे ना ( ठाकरे सेना ) पूर्ण ताकदीने लढवीत आहे. हे शक्य आहे केवळ कट्टर शिवसैनिकांमुळे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच शिवसैनिक ताकदीने उतरले आहेत.शिवसैनिक, उमेदवार यांना अनेक आमिषे दाखवली गेली, प्रलोभने दाखविली गेली मात्र कडवे, निष्ठावंत सैनिक याला बळी पडले नाहीत. ह्या सर्वच सैनिकांचा पक्षाला अभिमान आहे. या सर्वांच्या पाठीशी शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे. जनतेपर्यंत जावा त्यांच्या मागण्या काय आहेत त्या जाणून घ्या. जनता आपल्या पाठीशी नक्कीच आहे असा विश्वास तळवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी अरुण दूधवडकर,तळवडे जिल्हा परिषदेचे उमेदवार रुपेश राऊळ, पंचायत समिती सभापती पदाच्या उमेदवार श्वेता सुनील जाधव,तालुका प्रमुख राजू शेटकर, रमेश सावंत सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!