सावंतवाडी शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले कोलगाव हे गाव. शहरालगत हे गाव असल्यामुळे ज्या पद्धतीने शहराचा विकास होतोय त्याप्रमाणे या गावाचा विकास व्हावा ही प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे. मात्र विकासाचे हे शिवधनुष्य कोण पेलू शकतो हा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यावेळी एकच नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे महेश सारंग.

महेश सारंग यांची राजकीय कारकीर्द बघितली तर सरपंच पदापासून सुरु झाली होती. सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. त्यांच्या मातोश्री वृंदा सारंग या सावली सारख्या त्यांच्या मागे राहत त्यांना राजकीय जीवनात घडवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
जीवनात अनेक कटू प्रसंग घडून देखील त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. ज्याप्रमाणे गढूळ पाणी असताना ते पाणी स्वच्छ होण्यासाठी काही वेळ जावा लागतो त्याचप्रमाणे महेश सारंग यांनी तो कटू काळ जाऊ दिला. त्यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोप, टिकेला त्यांनी आपल्या विकास कामांमधून उत्तर दिले. त्यांचं हे उत्तर एवढे जबरदस्त होते की विरोधक वेळोवेळी चितपत होत गेले.
आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते स्वतः भाजप, शिवसेना ( शिंदेगट ), राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) आणि इतर घटक पक्ष असलेल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. विरोधक या निवडणुकीत त्यांच्यावर आरोप करत त्यांना शह देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. मात्र यावर महेश सारंग हे कोणतीही प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत नाही आहेत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर प्रत्येक व्यक्ती करत असतो. विरोधक देखील ते करताना पाहायला मिळत आहेत मात्र माझा निवडणुकीचा मुद्दा हा केवळ विकास कामांचा असेल.
आज कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव, कारिवडे या गावांचा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये समावेश होतो. या गावातील विकास कामांचा विचार करायचा झाला तर त्याची उत्तरे ही तेथील जनताच देताना पाहायला मिळत आहे. रस्ते, पाणी, वीज, सामाजिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, या सर्व विषयांवर जर कोणती व्यक्ती आवाज उठवत असेल तर महेश सारंग यांचं नाव पुढे येते. या मतदारसंघात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी वाडी- वाडीवर पोचलेले रस्ते, वीज, पाणी महेश सारंग यांच्या कामाची पोचपावती देत असतात.घरकुल योजनेच्या बाबतीत जिल्ह्यात देखील त्यांचं नाव आदराने घेतलं जात. त्यांनी जेवढी घरकुले मंजूर करून आणली तेवढी घरकुले विरोधकांच्या खिजगणितात देखील नसतील.
युवांना स्वतः च्या पायांवर उभे राहता यावे, ते स्वयंपूर्ण व्हावे यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक युवांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यामध्ये मोठी जबाबदारी पार पाडली आहे. युवा हे उद्याच्या भारताचे भविष्य आहे. त्यांनी वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून आपला विकास साधत देशाच्या योगदानात महत्वाची भूमिका बजवावी असे त्यांना प्रामाणिकपणे वाटत आहे.
असा हा लोकांच्या विकासासाठी सतत झटणारा, विकासाचा ध्यास घेणारा, रात्री-अपरात्री लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा, ऊन पाऊस यांची तमा न बाळगणारा, विकासाच्या केवळ गप्पा न करता तो करून दाखवणारा, असंख्य गरजू, गरीब, होतकरू लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा, युवांना रोजगार निर्मिती साठी साहाय्य करणारा, आबाल वृद्धाना आदराची वागणूक देणारा असा हा लोकनेता कोलगाव जिल्हा परिषद निवडणुकीत निश्चितच विजयी होईल असा सुर सर्वत्र आहे. विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने केवळ विरोधाला विरोध एवढच कार्य त्यांच्याकडून चालू आहे. मात्र याला सुद्धा विकासाच्या रूपाने उत्तर देत ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि विजयी देखील होतील. कारण जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. यामुळेच म्हणावं लागत की तो लढतोय केवळ विकासासाठी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!