रेडी जिल्हा परिषद मतदार संघात अनेक विकास कामे महायुतीच्या माध्यमातून झालेली आहेत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्याने महायुतीचे सर्वच कार्यकर्ते माझ्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या मेहनतीने आणि जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय हा नक्की आहे असे प्रतिपादन आरवली येथे प्रचार करताना रेडी जिल्हा परिषद चे युतीचे अधिकृत उमेदवार प्रितेश राऊळ यांनी केले.पर्यटन दृष्ठ्या रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाला फार मोठे महत्व आहे. औदयोगिक करणाच्या बाबतीतला विकास असेल, पर्यटनच्या माध्यमातून असेल इथल्या महिलांना, युवांना, युवतींना रोजगार उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य असेल. ते निवडून आल्यावर पार पाडेनच. प्रसंग कोणताही असो तुम्ही मला कधीही कोणत्याही क्षणी मला हाक मारा मी सदैव मदतीला धावून येईन असा शब्द देखील यावेळी प्रितेश राऊळ यांनी दिला. यावेळी राहुल गावडे, युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
