• इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा कौतुक सन्मान सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी संपन्न झाला. ही संस्था शिक्षण, कला व संस्कृती , सामाजिक पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, विचारप्रवर्तक उपक्रम राबवणे, तसेच गुणवंत व्यक्ती व कार्याचा योग्य सन्मान करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.ही संस्था सामाजिक भान, बौद्धिक विकास, सांस्कृतिक जतन व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांद्वारे राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान देते.समाजात आपली ओळख निर्माण होण्यासाठी आपल्याकडून चांगलं कार्य घडणं अपेक्षित आहे तरच आपल्याला समाजात मान मिळतो असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सौ मानसी राणे परब यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. श्री. विजय जाधव साहेब, उपनियंत्रक , नागरी संरक्षण, नवी मुंबई समुह, ठाणे(गृह विभाग विशेष , महाराष्ट्र शासन), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भूपेंद्र संखे, समाजसेवक भारत खांडेकर, समाजसेवक प्रभाकर कांबळे, लक्ष्मीकांत पोपळे सह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. बी. एन. खरात यांनी केले. तर सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. स्नेहल येवला यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!