अखंड सेनेचे ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे सेना गट असे दोन भाग झाले त्यावेळी बरेचसे शिवसैनिक हे शिवसेना (शिंदेसेना) मध्ये दाखल झाले. अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांना जवळ केले. काही निष्ठावान शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंच्या सोबत निष्ठेने राहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर आमदार वैभव नाईक, रुपेश राऊळ आणि हजारो शिवसैनिक हे आजही कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
कितीतरी आमिषे, प्रलोभने देण्याचा प्रयत्न झाला मात्र शिवसेनेचा हा लढवय्या त्यांच्या आमिषाला बळी पडला नाही. त्याने आपली निष्ठा मशालीवर कायम ठेवली.
आज तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून ठाकरे सेनेकडून ते निवडणूक लढवत आहे. हा लढवय्या लोकांच्या मनात कधीच विजयी झाला आहे केवळ न केवळ निष्ठेने. इथल्या जनतेने या निष्ठेने वाहून घेतलेल्या रुपेशला कधीच स्विकारलंय. स्थानिक उमेदवार, इथल्या प्रश्नाची असलेली जाण, निष्कलंक व्यक्तिमत्व, जनमाणसात मिळून मिसळून वागणे यामुळे या मतदारसंघात जनतेचा कौल हा नक्कीच रुपेश राऊळ यांच्याकडे झुकलेला दिसतोय.
सगळं काही पैशाने विकत घेता येत मात्र निष्ठा विकत घेता येत नाही. ती मिळवावी लागते. रुपेश राऊळ यांनी ती सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करत ती मिळवली आहे. त्यांना माहित आहे आता निष्ठावान मतदार, शिवसैनिक कोणत्याच
आमिषाला बळी पडणार नाही आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलणार आहे. ही रुपेश राऊळ रुपी निष्ठेची धगधगती मशाल परिवर्तन घडवणार आहे..
