३ जी,४ जी, सीम असूनदेखील व्यवस्थित रेंज नाही. समोरील व्यक्ती काय बोलतो ते कळत नाही.तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात.ती फसवणूक तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये बंद करा नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा प्रयाण महिला टूरीझम संस्था व सामाजीक कार्यकर्त्यां यांनी बी. एस. एन. एल. office मध्ये निवेदनद्वारे दिला. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रयाण महिला टूरीझम संस्था अध्यक्ष अपर्णा कोठावळे, संस्थापक अध्यक्ष आणारोजिन लोबो, माजी नगरसेविका भारती मोरे, माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे यांनी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांना दोन महिन्याचा कालावधी या रणरागिणी यांनी दिला.यावेळी सायली होडावडेकर, लतिका सिंग,शाजिदा रेडकर, सत्वशीला कुपवडेकर, स्मिता नाटेकर, कमल मांडवकर, दीपाली सावंत, शर्मिला दापले,प्रतिमा नाटेकर, लक्ष्मी मेस्त्री, रत्नाकर मेस्त्री, सुजाता वारंग, अस्मिता साईल,नासिर पटेल आदि महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!