दोडामार्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर आज मतदाना दिवशी भाजपा युवानेते विशाल परब यांनी दोडामार्ग तालुक्यातील माटणे जिल्हा परिषदेतील माटणे, आयी, वझरे येथील ठिकठिकाणी बुथवर भेटी देऊन आढावा घेतला व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्यासमवेत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, शिरिष नाईक, प्रितम पोकळे, पंचायत समिती उमेदवार पार्वती गवस, बबलू पांगम, शानी बोर्डेकर, माजी सरपंच महादेव गवस आदी उपस्थित होते..
