filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 128;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 32;

सावंतवाडी नगरपालिकेची आजची सभा गाजली ते माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या आक्रमक भूमिकेमुळे.संजू परब यांनी ही सभा विद्यमान नगर अध्यक्षा श्रद्धा भोसले ह्या ऑनलाइन पद्धतीने चालवत होत्या त्याला आक्षेप घेतला. प्रभारी नगराध्यक्ष असताना अशा प्रकारे ऑनलाईन द्वारे सभा चालवणे योग्य नाही. त्यांच्या या मागणीला बाकी सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आजची सभा प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संजू परब यांनी एकाच वेळी दोन दोन अध्यक्ष असणे हे योग्य नाही त्यामुळे ऑनलाईन असणाऱ्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांना विरोध करत तातडीने सभेतील लॅपटॉप बंद करण्यास भाग पाडले.याची माहिती नगरसेवक संजय परब यांनी सभा पार पाडल्यानंतर पत्रकारांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!