आज सावंतवाडी नगरपालिकेची पहिलीच सभा पार पाडली. विशेष म्हणजे या सभेत भाजप आणि शिवसेना ( शिंदे सेना ) यांच्यातच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. दोन्ही पक्ष राज्य पातळीवर सत्तेत आहेत. मात्र नगरपालिका निवडणुकीत वेगवेगळे लढल्याने या पालिकेवर भाजपची सत्ता आली. विद्यमान नगराध्यक्षा श्रद्धा भोसले ह्या उपस्थित नसल्याने आजच्या सभेचे अध्यक्ष हे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर हे होते. पेशाने वकील असल्याने त्या ज्ञानाचा उपयोग करत उपस्थित अनेक नगरसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे मोठ्या कसबिने दिली. त्याचप्रमाणे सभागृहात कोणत्याही प्रकारची हमरी तुमरी होणार नाही याची दक्षता घेत ही सभा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चालवली. ज्या ज्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले त्या त्या नगरसेवकांना संबंधित खात्यातील नगरसेवकांकडून अपेक्षित उत्तरे मिळवून दिली. आजची ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यांच्या या स्पष्ट वक्तशीरपणा, एखाद्या विषया विषयी असलेले सखोल ज्ञान,प्रशासकीय ज्ञान यामुळे प्रभारी नगराध्यक्ष ऍड.अनिल निरवडेकर यांनी आज वेगळी छाप पाडली.
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 33; 