२० फेब्रुवारी दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात काही गावगुंडानी दारूच्या नशेत छत्रपती शिवरायांचे स्मारक उखडून काढण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळी त्या गावातील काही शिवप्रेमी भगिनी यांनी स्मारक हलवण्यास प्रखर विरोध केला त्यावेळी त्या गुंड प्रवृत्तीच्या नराधमांनी त्या भगिनींचे कपडे काढून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली , ज्या आपल्या राजाने पर स्त्रीला ही माते समान मानले, त्या छत्रपतींच्या स्वराज्यात स्त्रीवर, वर नजरेने पाहणे हा सुद्धा मोठा अपराध होता, स्त्री वर अत्याचार झाला तर त्याच क्षणी देह दंडाची शिक्षा दिली जात होती. आणि आज मात्र हे नराधमांना जर मोकळे सोडले तर ते भविष्यात आणखी माजतील आणि ह्या पेक्षाही मोठे कृत्य करतील. अशा घाणेरड्या वृतीच्या नराधमांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. नाहीतर शिवरायांना विरोध करणाऱ्या बांडगुळांची संख्या वाढेल. हे आपल्या महाराष्ट्रात आपल्याला होऊ द्यायचे नाही.त्यासाठी सरकार दरबारी आपल्या सर्व शिवप्रेमीची ह्या भावना पोहचवण्यासाठी आज दि. २४ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार दोडामार्ग आणि पोलीस निरीक्षक दोडामार्ग यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी तालुक्यातील शेकडो शिवप्रेमी आणि महिला शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!