म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने वाहनधारकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.याची दखल घेत जिल्हा परिषद म्हापण मतदार संघाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.यज्ञा साळगांवकर,म्हापण पंचायत समिती मतदार संघाचे नवनिर्वाचित सदस्य श्री.आपा फणसेकर, शिवसेना म्हापण विभागप्रमुख श्री.दत्ता साळगांवकर,आबा कोचरेकर यांनी काल सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी कार्यकारी अभियंता पुजा इंगवले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.येत्या आठ दिवसांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा शब्द दिला.त्याप्रमाणे कामाला सुरुवात होईल, नवनिर्वाचित सदस्यांनी या महत्त्वाच्या कामात लक्ष घालून हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल सर्व प्रवाशी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.त्याचप्रमाणे म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील विविध कामाबाबत चर्चा करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!