हा कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. समाजकार्य, नेतृत्वगुण आणि विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे सौ. जाधव यांना ‘नवदुर्गा सन्मान’ प्रदान करण्यात आला.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजहितासाठी सातत्याने कार्य करत असलेल्या सौ. प्रांजल जाधव यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित व्यक्तींना शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ. प्रांजल जाधव यांना मिळालेल्या या सन्मानामुळे शेर्ले गावासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, दिनेश गावडे यांनी विशेष अभिनंदन केले असून सौ. जाधव यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
