प्रयाण महिला टुरिझम संस्था कडून दिनांक 11 मार्च (बुधवार )रोजी सायंकाळी ठिक ४:३० वाजता नगरपालिका कॉन्फरन्स हॉल मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला .डॉ. मीनल सावंत यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.तसेच प्रोटीन, कॅलशियम, आयर्न टॅबलेटस गरजेनुसार वाटप करण्यात आले.प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देखिल दिली. २००हुन अधिक महिलांनी महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.
यावेळी सभापती सुस्मिता जाधव यांचा सभापती पदी निवड झाल्याबद्दल प्रयाण च्या अध्यक्ष अपर्णा कोठावळे यांनी शाल,श्रीफळवभेटवस्तू देऊन सत्कार केला.PSI माधवी मुळीक प्रमुख पाहुणे होत्या. त्यांनी महिलांना ऑनलाईन शॉपिंग मध्ये होणारी फसवणूक याविषयी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.त्यांचा सत्कार अनारोजिन लोबो यांनी केला.यावेळी मनाली राऊत, हेमांगी माने, सुरेखा पवार, जयश्री बिर्जे या कर्तृत्ववान महिलांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष अपर्णा कोठावळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.संस्थापक अध्यक्ष अनारोजिन लोबो यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. सहसचिव भारती मोरे यांनी आभार मानले.छाया देशपांडे, मारसेलिना डिसोझा, कीर्ती बोद्रे आदी संचालक उपस्थित होते.तसेच मिरा सावंत, सायली होडावडेकर, ज्योत्स्ना सुतार, आरती खोरागडे, निता प्रसादि,नगरसेविका किर्ती बोंद्रे, वैशाली पटेकर, माधुरी वाडकर, किरण नाटेकर यादेखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
