आजची स्त्री ही स्वाबलंबी बनली पाहिजे. तिला कुणापुढेही कसल्याच गोष्टीसाठी विसंबून राहता लागू नये. यासाठी सर्व स्त्रियांनी रोजगार निर्मितीकडे वळले पाहिजे. आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. खांद्याला खांदा लावून मेहनत घेत आहेत. हीच मेहनत त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करते असे मार्गदर्शन साळगाव येथे महिला दिनानिमित्त सौ. मानसी परब यांनी काढले. समृद्धी प्रतिष्ठान च्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला होता. प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित होत्या. यावेळी तनुजा साळगावकर,प्रतिक्षा परुळेकर, रेवा साळगावकर,सिद्धी जोशी,रेश्मा पेडणेकर,रश्मी पडवळ,सुमन साळगावकर,सुप्रिया साळगावकर,स्नेहलता साळगावकर, प्रतिज्ञा बिडये,विश्वनाथ परुळेकर,अमोल साळगावकर,अक्षय साळगावकर, रोशन पेडणेकर आदि उपस्थित होते.
