निगुडे ग्रामसंघ मार्फत महिला दिन जिल्हा परिषद निगुडे शाळा नंबर ०१ या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन राऊळ यांच्यामार्फत सदर कार्यक्रमास बक्षीसे देण्यात आली. यावेळी श्री. राऊळ यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते श्री.सुहास ठाकूर यांचा या कार्यक्रमात ग्राम संघाच्या अध्यक्षा प्राची कुणकेरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर यांनी केले ज्यांनी स्त्रीला जगण्याचा ज्यांनी आधार दिला अशा आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अनेक स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये अनेकांनी क्रमांक मिळवले त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी व्यासपीठावर ग्राम संघाच्या अध्यक्षा प्राची कुणकेरकर, लिपिक विशाखा चौकेकर, सचिव जान्हवी जाधव, रोहिणी गावडे, गंधाली निगुडकर, रूपाली राणे, सुहासिनी निगुडकर, शर्वरी गावडे, संजना केसरकर, निगुडे डाटा ऑपरेटर ग्रामपंचायत स्नेहल नाईक, संजना गावडे, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!