महिला दिनानिमित्त गोठोस – निळेली येथे इकिगाई फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने महिला मेळावा संपन्न झाला.

यावेळी गोठोस सरपंच सूरज कदम,माजी सरपंच सानिका डिगे,इकिगाई संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव,दीपक कोठावळे,संस्थेच्या कार्यकर्त्या रसिका कदम, दिव्या राऊळ, विजया नेरूरकर, रुबीना डिसोजा,दीप्ती कोठावळे, अंकिता डोईफोडे, प्रतीक्षा कदम,नेहा गवंडी,रसिका डिगे यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

सुरवातीला सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सूरज कदम, संस्था अध्यक्ष दीपक जाधव, सानिका डिघे,दीपक कोठावळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. यात उखाणी घेण्याची स्पर्धा, ग्लास बलून, बादलीत बॉल टाकणे व संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आला. व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका डिगे यांनी केले तर आभार रसिका कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसिका कदम, दीप्ती कोठावळे, सानिका डिगे, दीपक कोठावळे, रुबीना डिसोजा यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!