तळगांव गुणगौरव समितीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी *तळगांव भूषण* पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या परंपरेचे सातत्य राखत, यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

तळगांव भूषण पुरस्कार २०२५ यावर्षीचा मानाचा पुरस्कार *श्री. प्रभाकर भाऊ दळवी* यांना जाहीर करण्यात आला आहे.

 

गेल्या ६ दशकांहून अधिक काळ त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य आणि देवस्थान संस्थेचे विश्वस्त म्हणून तळगांवच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या निस्पृह सेवेचा गौरव म्हणून हा सन्मान करण्यात येत आहे.

 

*✨ विशेष गौरव सोहळा ✨*

याच सोहळ्यात तळगाव गावची कन्या आणि बाल कवयित्री कुमारी समीक्षा उमेश तळगांवकर हिचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तिचा “मनातल्या रेषा” हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला असून, तिच्या या साहित्यिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान आयोजित केला आहे.

 

कार्यक्रमाचा तपशील

दिनांक: गुरुवार, २१ मे २०२६

वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत

ठिकाण: श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, तळगांव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.

 

तरी या सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या ग्रामस्थांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.अशी विनंती तळगांव गुणगौरव समितीवतीने नितिन सुनंदा बाळकृष्ण सावंत यांनी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!