दिनांक २५ जुर्ले रोजी कुडाळ तालुक्यातील तेर्से बांबार्डे या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक क्रेंद्र शाळा नं १ येथे संत साहीत्य व संविधान याची अनोखी सांगड घालणारा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला .

आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर संत परंपरा याचा वारसा जोपसला जावा . व संविधानिक मुल्यांची जन जागृती व्हावी या उद्देशाने यसार सोशल फाउंडेशन च्या वतीने “आम्ही संविधानी आम्ही वारकरी ” या उपक्रमाचे आयोजन केले .

या कर्यक्रमात मराठी अभ्यास केंद्र निमंत्रक , शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे डॉ . दिपक पवार यांनी शालेय जीवनात संविधानिक मुल्यांची गरज व ग्रामीण भागातील मराठी शाळा , मराठी भाषा , मराठा धर्म वाचवण्याची आपण सर्वानी एकत्र येऊन काम केले पाहिजे तसेच . शाळा -शाळा मध्ये असे उपक्रम होणे गरजेचे आहे असे सांगितले . यसार फाउंडेशनच्या या नाविन्य पूर्ण उपक्रमाचे कौतुक केले .

भाषा अभ्यासक व सदस्य भाषा सल्लागार समितीचे डॉ . प्रकाश परब यांनी “आम्ही संविधानी आम्ही वारकरी ” या उपक्रमा बद्दल बोलताना संविधान अमलात येण्या पूर्वी आपल्या महाराष्ट्रात संत परिवाराने जगण्याची आदर्श संहिता निर्माण करून भेदा – भेदा विरोधात काम केले .

या कार्यक्रमात गावातील वारकरी संप्रदाय जपणाऱ्या ग्रामस्थांचा संविधान उद्देशिका देऊन सन्मान करण्यात आला . तसेच शालेय मुलांची वारकरी संप्रदाय आधारित वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली .

उपस्थित ग्रामस्थ कार्यक्रमाचे पाहुणे ,विद्यार्थी व गावडेवाडी भजन मंडळ यांनी गोल रिंगण करून विठुरायाच्याया गजरात कार्यक्रमाची समाप्ती केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक यसार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यवान तेंडोलकर यांनी केले . तर आभार प्रदर्शन वामन बांबार्डेकर यांनी केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तेर्से बांबार्डे गावचे सरपंच श्री रामचंद्र परब यांनी भुषविले . तर कार्यक्रमा साठी प्रमुख मार्गदर्शक डॉ . दिपक पवार तसेच डॉ प्रकाश परब व अमोल पाटील लाभले . या कार्यक्रमा साठी पर्यावरण विषयक काम करणारे श्री प्रसाद गावडे ( रानमाणूस ) यसार फाउंडेशन चे संस्थापक सत्यवान तेंडोलकर सह संस्थापक सौ अनन्या तेंडोलकर इकिगाई फाउंडेशनचे दिपक जाधव , सौ महीमा कदम , संविधान प्रचारक प्राजक्ता नेमळेकर , सामाजिक कार्यकर्त्या रेवती वालावलकर , भारत मुक्ती मोर्चाचे कु चैत्राली लाडु जाधव , विद्यामान ग्रामपंचायत सदस्य श्री अजय डिचोलकर , शाळा मुख्याधापक श्री अनंत राणे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ . प्रिती धूमक , पोलीस पाटील रमाकांत जाधव , यसार फाउंडेशन उपाध्यक्ष श्री वामन बांबार्डेकर , सह शिक्षक सौ मिताली टिळवे , श्री रूपेश वालावलकर , गावातील गावडे वाडी वारकरी संप्रदाय भजन मंडळ , गावातील आशा आरोग्य सेविका , अंगणवाडी सेविका मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!