संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, या क्षेत्रांचा विचार करायचा झाला तर भाईसाहेब सावंत, विकास सावंत यांचं नाव अग्रक्रमांकावर निश्चितच घेतलं जात. अनेक शैक्षणिक संस्था उभारून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण सुलभ केले. समाजकार्यातून राजकारण करत कित्येक विकास कामे केली. त्यांचा त्याग, त्यांची तळमळ आजही जिल्हा वासिय विसरले नाहीत. सत्तेचा कोणताही उन्माद कधी भाईसाहेब सावंत असतील किव्हा विकास सावंत असतील यांनी केला नाही.
हाच वारसा सक्षमपणे पुढे नेण्यासाठी विक्रांत सावंत यांच्याकडे पाहिले जात. माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून ते निवडणूक लढवत आहेत. मात्र हे एका रात्रीत घडलं नाही. वारसा पाठीशी असला तरी संघर्ष त्यांनी जवळून बघितला आणि अनुभवला देखील. अनेक संकटे उभी राहिली मात्र त्यांचा त्यांच्या मनावर तसुभरही परिणाम झाला नाही.
वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक दुःख समोर आली. मात्र वारसा मुळात लढावू वृत्तीचा असल्याने ते डगमगले नाहीत. त्यांनी ते दुःख देखील पचवलं.
आज होऊ घातलेल्या जि. प. निवडणुकीत प्रचाराचा शुभारंभ करताना ते थोडेसे भावुक देखील झाले. ही भावुकता दर्शवते की माणूस कितीही मोठा होऊ द्या त्याची नाळ ही जमिनीशी जोडली असणे आवश्यक आहे. ही नाळ त्यांनी अजूनच घट्ट केली. प्रचारात अनेक मुद्दे पुढे येतील मात्र विकास, विकास, आणि फक्त विकास एवढाच ध्यास घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज तरुणांईकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. इथल्या युवांनी वेगवेगळी कौशल्य आत्मसात करावी अशी त्यांची इच्छा आहे. आज तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न पळता एखादा स्वतः चा व्यवसाय करून आत्मनिर्भय बनणे गरजेचे आहे हे ते आवर्जून सांगतात.
ज्या वेळी विक्रांत सावंत यांना जि. प. तिकीट जाहिर झालं तेव्हापासून ते आतापर्यंत सर्व स्थरातील नागरिकांचा त्यांना फार मोठा पाठिंबा मिळत आहे. तो दिवसेंदिवस वाढतंच जाणार यात कोणतीही शंका नाही. जेव्हा एखादा स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार लोकभावनेतून निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळी त्याचा विजय हा निश्चित असतो. आजही विक्रांत सावंत जनतेने आपल्याला आशीर्वाद द्यावेत विकासाचा रोड मॅप मी करून दाखवेन असं ठामपणे सांगत आहेत.
भाईसाहेब सावंत, विकास सावंत असतील यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने जे करून दाखवलं ते नक्कीच विक्रांत सावंत करून दाखवतील यात कोणतीही शंका नसेल. यासाठीच असं म्हणावं लागेल की, होय हीच वेळ वारसा पुढे नेण्याची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!