कणकवली तालुक्यातील कोळोशी गावचे उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष इंदप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने कोळोशी परिसरात भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले, असून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी नाम. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.यावेळी प्रवेश करताना सांगितले की, भारतीय जनता पार्टी पक्षाच्या ध्येय – धोरणांवर विश्वास ठेवून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा आमचा निर्धार आहे. आमच्याकडून जि काही मदत लागेल ती नक्कीच आम्ही करू. भारतीय जनता पार्टी पक्ष हा देशातील एकमेव असा विकासाची ध्येयधोरणे पुढे घेऊन जाणार आणि सर्वच बाबत विकासासाठी कटिबद्ध असणारा पक्ष आहे. आमच्या गावच्या विकास हा देखील भारतीय जनता पार्टी पक्ष आणि आमचे सर्वांचे लाडके पालकमंत्री ना. नितेश राणे साहेबच करू शकतात. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत आहोत. यावेळी कमलाकर कदम, संजय कदम, प्रशांत तांबे, सूर्यकांत कदम, शुभम कदम, नारायण कदम, नम्रता कदम, रेशमा तांबे, रमेश तांबे, सुरेश कदम, कृष्णा तांबे, प्रतिभा तांबे आदींनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे.पक्षप्रवेश कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, उमेदवार संतोष पारकर, माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर बुवा, शक्ती केंद्र प्रमुख सुशील इंदप, नांदगावचे सरपंच भाई मोरजकर, पंढरीनाथ वायंगणकर चंद्रकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!