काही लोक जाणून बुजून खोट्या अफ़वा पसरवत आहेत. त्या अफवांना कोणीही बळी पडू नये. जिल्ह्यात सर्व ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवीत आहोत. कोलगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक देखील युतीच्याच माध्यमातून लढविली जात आहे. महेश सारंगच हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. कोणी कितीही अफवा पसरिवल्या तरी आमचा पाठिंबा हा महेश सारंग आणि त्यांच्या इतर उमेदवारांना आहे. लोकांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये. इथे विजय हा महायुतीचाच होईल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी कोलगाव येथील जाहिर सभेत केला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद उमेदवार महेश सारंग, पंचायत समिती पदाचे उमेदवार प्राजक्ता केळुस्कर, संध्या हळदणकर, कोलगाव सरपंच आणि भाजप आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, मंगेश तळवणेकर, कोलगाव माजी सरपंच बलवंत कुडतरकर, साबाजी धुरी आदि पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि कोलगाव जिल्हा परिषद मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 38; 