दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी शहरामध्ये मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग व मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उप परिसर, सावंतवाडी समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.

या रॅलीसाठी तहसीलदार मा. श्रीधर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. जयेश खांदरकर, मुंबई विद्यापीठ डायरेक्टर मा. श्रीपाद वेलिंग, नगरपालिका अधिकारी मा. गोविंद गवंडे, माय भारत माजी स्वयंसेवक जयराम जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. अमर निर्मळे, अनुभव शिक्षा केंद्राचे सहदेव पाटकर, प्रा. पुनम गायकवाड, प्रा. कालिदास शिंदे, पब्लिक रिलेशन फाऊंडेशनच्या फातिमा मकानदार व अनुभव साथी सुदीप दिगवळेकर उपस्थित होते.

रॅलीदरम्यान मतदान जनजागृती विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. “मतदान करुया, लोकशाही रुजवूया” हा संदेश देत नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करण्यात आले. सदर उपक्रम नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!